“ज्ञानवापीचा इतिहास बदलता येने अशक्य, पण…”; सरसंघचालकांचे मोठे विधान!


ज्ञानवापी संदर्भात जो इतिहास आहे. त्याला आम्ही बदलवू शकत नाही. त्यावर वाद निर्माण केले जात असून रोज नवनवे पुरावे सादर केले जात आहे. मात्र, आम्हाला अयोध्येतील राम मंदिरनंतर आता आंदोलन करायचे नसल्याचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. रेशीमबाग येथील मैदानावर राष्ट्रीय संवयेसवक संघाच्या तृतीय संघ शिक्षा वर्गाच्या समारोपाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळेस ते बोलत होते.

मुस्लिम व हिंदूनी आपआपसात समन्वय ठेवत सर्वसंमतीने आणि न्यायालयाचा सन्मान राखत यातून मार्ग काढला पाहिजे. मात्र, आपल्या स्वार्थासाठी देशात भेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात फसू नये, असे आवाहन मोहन भागवत यांनी केले. जेव्हा इस्लाम आक्रमकांच्या माध्यमातून भारतात आला, तेव्हा भारताचे स्वातंत्र्य हवे असलेल्या लोकांचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी हजारो देवस्थाने उद्ध्वस्त करण्यात आली. हिंदू मुस्लिमांच्या विरोधात विचार करत नाही, तर त्यांचे पुनरुज्जीवन व्हावे असे हिंदूना वाटते. पण मनात प्रश्न निर्माण होतात. असे काही असेल तर एकत्र येऊन प्रश्न सोडवा असेही भागवत म्हणाले.

No comments:

Post a Comment