दिल्ली विकास प्राधिकरण (DDA) ने सहाय्यक संचालक (लँडस्केप), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल/मच) बी, प्रोग्रामर, कनिष्ठ अनुवादक (राजभाषा) पदांच्या भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार dda.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया ११ जूनपासून सुरू झाली आहे.
याशिवाय, उमेदवार https://cdn.digialm.com/EForms/configured या लिंकवर क्लिक करून या पदांसाठी थेट अर्ज करू शकतात. यासह, तुम्ही https://cdn.digialm.com//per/g01/pub/726/EForms/image/Image या लिंकद्वारे अधिकृत अधिसूचना देखील पाहू शकता. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण २७९ पदे भरली जातील.
महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – ११ जून २०२२
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० जुलै २०२२
रिक्त जागांचा तपशील
एकूण पदांची संख्या – २७९
(हे ही वाचा: SBI Recruitment 2022: ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’मध्ये नोकरीची संधी; जाणून घ्या अधिक तपशील)
पात्रता निकष
असिस्टंट डायरेक्टर (लँडस्केप) – लँडस्केप आर्किटेक्चर मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा स्थापत्यशास्त्रातील पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून समकक्ष किंवा वनस्पतिशास्त्र किंवा कृषी किंवा फलोत्पादनातील पदवीधर. तसेच, मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून लँडस्केप नियोजनाचा किमान एक वर्षाचा अनुभव.
जेई – संबंधित क्षेत्रात डिप्लोमा.
प्रोग्रामर – संगणक विज्ञान/संगणक अभियांत्रिकी/इलेक्ट्रॉनिक्स मधील अभियांत्रिकी पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा अभियांत्रिकी महाविद्यालय/संस्थेमधून संगणक विज्ञान/संगणक अनुप्रयोगातील पदव्युत्तर पदवी.
कनिष्ठ अनुवादक (राजभाषा) – एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी किंवा पदवी स्तरावर इंग्रजी विषय म्हणून हिंदीमध्ये किंवा समकक्ष पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी किंवा पदवी स्तरावर विषय म्हणून इंग्रजीमध्ये समकक्ष. तसेच मान्यताप्राप्त संस्थेतून अनुवादाचा डिप्लोमा/ सर्टिफिकेट कोर्स असावा.
नियोजन सहाय्यक – मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून नियोजन/आर्किटेक्चरमध्ये बॅचलर पदवी.
वायोमार्यदा किती आहे?
सहाय्यक संचालक (लँडस्केप) – ३५ वर्षे
जेई – १८ ते २७ वर्षे
प्रोग्रामर – ३० वर्षे
कनिष्ठ अनुवादक – ३० वर्षे
नियोजन सहाय्यक – ३० वर्षे
अर्ज फी किती?
उमेदवारांना १०००/- रुपये भरावे लागतील.

No comments:
Post a Comment