गूळ खाणे किती महत्त्वाचे ? मग नक्की वाचा !






आरोग्यविषयक : ऋतुमानानुसार आहार हे आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. सणासुदीच्या निमित्ताने आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश केलेला आढळतो. आता थंडीच्या दिवसात आवर्जून गुळाच्या पदार्थांचा आहारात समावेश केला जातो. पण नेहमीच गुळाचे (Jaggery) सेवन केल्यास आरोग्यासाठी ते फायदेशीर ठरते. भारतीय संस्कृतीत घरी येणाऱ्याला विशेषतः उन्हातून आल्यास गूळ आणि पाणी देण्याची प्रथा आहे. गुळाचे आरोग्याला असणारे अनेक फायदे सिद्ध झाले आहेत. जाणून घेऊया गुळ खाण्याचे विविध फायदे

1. शरीर कार्यक्षम राहतं - गुळामुळे शरीर मजबूत आणि कार्यक्षम राहते. शरीर ताकदवान बनवण्यासाठी दुधात गूळ घालून घेणे उपयुक्त ठरते. दुध आवडत नसल्यास एक कप पाण्यात पाच ग्रॅम गूळ, थोडासा लिंबू रस आणि काळे मीठ घालून प्यायल्यास थकवा दूर होईल.

2. पोटाच्या तक्रारींवर गुणकारी - पोटाच्या विविध तक्रारींवरही गूळ हा रामबाण उपाय आहे. गॅसेस, अॅसिडीटीची (Acidity) तक्रार असेल तर, गूळ खाण्याने त्रास कमी होतो.

3. रक्ताची कमतरता भरून निघते - गूळ हा लोहाचा (Iron) मोठा स्रोत आहे. तुमचं हिमोग्लोबिन (Hemoglobin) कमी झाले असेल तर रोज गूळ खाण्यानं तात्काळ फायदा होतो. गूळ खाण्यानं शरीरातील लाल पेशींची संख्या वाढते. त्यामुळे गर्भवती महिलांना डॉक्टर गूळ खाण्याचा सल्ला देतात.

4. सांधेदुखीतून सुटका – सांधे दुखत असतील (Joint Pains) तर गूळ आणि आलं एकत्र करून खाल्ल्यास फायदा होतो. दररोज आलं आणि गुळाचा एक खडा खाल्ल्यास सांधेदुखीला आराम पडतो.




5. भूक लागणं – जेवणानंतर गूळ खाल्ल्यानं पचन चांगलं होतं. गूळ खाण्यानं भूकही वाढते.

6. थकवा दूर होतो – गूळ खाण्यानं शरीराला ऊर्जा मिळते. थकवा दूर होतो. थकवा, कमजोरी जाणवत असेल तर जरूर गूळ खावा.

7. आंबट ढेकरींपासून सुटका – गूळ, सैंधव आणि काळे मीठ एकत्र करून खाल्लं तर आंबट ढेकर येणं थांबते.

8. रक्तदाब नियंत्रणात राहतो - गुळामुळे रक्तदाब (Blood Pressure) नियंत्रणात राहण्यास मदत होते. विशेषतः उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या लोकांना गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो.

9. हाडं मजबूत होतात - गुळात कॅल्शियम आणि फॉस्फरस यांचं प्रमाण अधिक असतं. हाडांना (Bones) बळकट करण्यात हे दोन्ही घटक महत्त्वाचे असतात. त्यामुळे गूळ खाण्यानं हाडांसाठीही लाभदायी ठरते.

10. फुफ्फुसातील संसर्ग रोखतो - गुळामुळे रक्त शुद्ध होत. चयापचयाचा (Metabolism) वेगही नियंत्रित राहतो. याशिवाय घसा आणि फुफ्फुसाच्या (Lungs) संसर्गावरही गूळ फायदेशीर ठरतो.

No comments:

Post a Comment