मनोरंजन : नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटातून मराठी कलाविश्वात पदार्पण करणारी ‘आर्ची’ अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरू हे नाव कोणालाही नवीन राहिलेलं नाही. नुकतंच झुंड या चित्रपटात झळकलेली रिंकू लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिंकू राजगुरुच्या नव्या चित्रपटाचा टीझर नुकतचं प्रदर्शित झाला आहे. या टीझरमुळे प्रेक्षकांची चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे.
रिंकू राजगुरु आणि विशाल आनंद ही नवी जोडी असलेला “आठवा रंग प्रेमाचा” या चित्रपटाचा टीझर नुकतचं प्रदर्शित झाला. अत्यंत फ्रेश आणि रोमँटिक कथा असलेल्या या चित्रपटाच्या लक्षवेधी चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली आहे. येत्या १७ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्येष्ठ अभिनेते मकरंद देशपांडे, रिंकू राजगुरू आणि विशाल आनंद हा नवा अभिनेता या चित्रपटातून पदार्पण करत आहे.
“आठवा रंग प्रेमाचा” या चित्रपटात आजच्या काळातली आणि फ्रेश कथा प्रेक्षकांना पाहता येईल. चित्रपटाच्या नावातच प्रेमाचे आठ रंग असल्याचं सांगण्यात आलं आहे. या चित्रपटाच्या टीझरमधून पहिले सात रंग कोणते ते स्पष्ट केलं आहे, आठवा रंग कोणता? याचं उत्तर चित्रपटाद्वारे मिळणार आहे. यात रिंकू राजगुरूचा ग्लॅमरस लूक, विशाल आनंदची चित्रपटसृष्टीतली दमदार एंट्री पाहायला मिळत आहे.
No comments:
Post a Comment