कंगनाला सोशल मीडियावरून नेटकऱ्यांनी केले ट्रोल.. सत्यता कळताच डिलीट केली पोस्ट



बॉलीवूडची क्वीन म्हणजेच अभिनेत्री कंगना रणौत ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. कंगना सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. कंगना ही नेहमीच सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय यासारख्या वेगवेगळ्या गोष्टींवर आपली भूमिका मांडताना दिसते. यावरून तिला सोशल मीडियावर बऱ्याच वेळा ट्रोल देखील करण्यात येते. आता पुन्हा एकदा कंगना वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
आता कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये कंगनाने कतार एअरवेजचे सीइओ अल बेकर यांच्या एका स्पुफ व्हिडिओवर प्रतिक्रिया देऊन त्यांची टिंगल केली आहे. कंगनानं कतार एअरवेजचे सीइओ यांच्या एका वेगळ्याच व्हिडिओचा स्क्रीन शॉट सोशल मीडियावर शेयर केला. काहीही न कळणाऱ्या व्यक्तीला गरीब माणसांची कसलीच किंमत वा जाणीव नसते. ती व्यक्ती कायमच दुसऱ्यांना पाण्यात पाहण्याचे काम करते. तुमच्यासारखे श्रीमंत लोक हे नेहमीच गरिबांना तुच्छ लेखतात, असेही कंगनानं त्या प्रतिक्रियेमध्ये म्हटले होते.
ज्यावेळी कंगनाला खऱ्या व्हिडिओविषयी कळालं तेव्हा मात्र तिची चांगलीच फजिती झाल्याचे दिसून आले. त्यानंतर लगेच कंगनाने तिची पोस्ट डिलिट केली.

No comments:

Post a Comment