तुर्की आईस्क्रीम ऑर्डर करताय??.. फूड डिलिव्हरीचा हा मजेदार अंदाज एकदा पाहा, Zomato ने लिहिले, ‘ट्राय इट युअर ओन रिस्क’

Zomato वरून फूड ऑर्डर करत असाल, तेव्हा काही मिनिटांत डिलिव्हरी होत असते. पण आज आम्ही तुम्हाला आईस्क्रीम डिलिव्हरीचा असाच एक मजेदार व्हिडीओ दाखवणार आहोत, जो पाहून तुम्ही तुमचे हसू आवरू शकणार नाहीत. खरं तर, आइस्क्रीम डिलिव्हर करण्याची ही मजेदार पद्धत आहे, जी खूपच मनोरंजक आहे. ग्राहकांना आईस्क्रीम डिलिव्हर करण्यासाठी विक्रेते अनेकदा लांब दांडी वापरून ग्राहकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. विक्रेता आणि ग्राहक काही काळ खेळतात आणि नंतर आईस्क्रीम दिली जाते.

           आईस्क्रीम सर्व्ह करण्याचा ही व्हायरल आणि मनोरंजक पद्धतीचा एक व्हिडीओ झोमॅटोने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. हा मजेशीर व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही हसू आवरू शकणार नाही. या व्हिडीओमध्ये झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय डिलिव्हरीसाठी आलेला दिसत आहे. एका व्यक्तीने तुर्की आईस्क्रीम ऑर्डर केली होती. ती डिलिव्हरी देत असताना डिलिव्हरी बॉयने ज्या पद्धतीने ही आईस्क्रीम दिली, ती पाहून तुम्हाला आणखी मजा येईल.

No comments:

Post a Comment