रोज चहा पिताय..??सावधान हे नक्की वाचा..

 


 

                 मित्रांनो चहा म्हटलं की चेहर्‍यावर हसू येतो चहा म्हणजे तरतरीत चहा म्हणजे फ्रेशनेस जणू काही गणितच आहे. सकाळी उठल्याबरोबर सर्वांनाच चहा पिण्याची सवय असते चहा पिल्या शिवाय खूप जणांना फ्रेश वाटत नाही चहा प्यायल्या शिवाय काम सुरू होत नाहीत एवढेच काय ऑफिसला जाताना ऑफिसमध्ये असताना आणि ऑफिसमधून घरी आल्यावर बाहेरून फिरून आल्यानंतर घरी आलो की चहा हा हवाच अशी ही चहाची महती आहे. 

                 मित्रांनो घरी कधी पाहुणे आले तर त्यांचे स्वागत चहा देऊनच केले जातं तसेच आपण बाहेर कुठे फिरायला गेलो कधी कंटाळा आला झोप आली तर काही लोक चहाच पितात.

               मित्रांनो चहा पिणं वाईट नाही परंतु तो प्रमाणात घेतला पाहिजे तसेच तो योग्य पद्धतीने तयार केला पाहिजे तरच या चहाचे आपल्याला फायदे मिळतात पण पाहतो की बाहेरचे चहाच्या टपर्‍या असतात तिथे चहाच भांड सकाळपासून ठेवलेला असतो. शिवाय हे भांडण ॲल्युमिनियम चा असतं यामुळे ॲल्युमिनियमचे विषारी रसायने चहामध्ये मिक्स होतात.याशिवाय बऱ्याच ठिकाणी प्लॅस्टिकच्या ग्लासमध्ये चहा दिला जातो यामुळे प्लास्टिकचे विषारी घटक चहा मध्ये उतरतात प्लास्टिकच्या ग्लासमध्ये चहा घेऊन कित्येक लोकांना कॅन्सर झाला आहे आणि हे संशोधनात सिद्ध झालेला आहे.

               मित्रांनो चुकीच्या पद्धतीने चहा प्यायला मुळे आपल्या आतड्यांना त्रास होऊ शकतो कॅन्सर होऊ शकतो किडनी खराब होऊ शकते अति चहा प्यायला म्हणून वाटतं अशा बऱ्याच गोष्टी चुकीच्या पद्धतीने चहा प्यायला मुळे होतात चला तर जाणून घेऊ या चहा पिण्याची योग्य पद्धत कोणती आणि तो कोणत्या वेळी घ्यावा. तुम्हाला सांगणार आहोत. पण त्या आधी चहा आपल्या शरीरावर कोणते परिणाम करतो हे आपण सायंटिफिक आणि मेडिकली दृष्ट्या पाहणार आहोत.

               मित्रांनो चहा मध्ये निकोटीन किंवा कॅफीनचे प्रमाण खूप असते चहा खूप उकळून प्यायल्यामुळे पोटात आम्ल निर्माण होते. अशा परिस्थितीत जर चहाचे व्यसन असेल तर पोटात गॅस आणिअॅसिडिटी  समस्या सुरू होते आणि पचन क्रिया मंदावते. जास्त चहा प्यायल्याने हाडांवर वाईट परिणाम होतो आणि हाड आतून पोकळ होतात रोज आठ ते दहा कप पिण्याची सवय असेल तर डोकेदुखी अस्वस्थपणा असे लक्षण दिसून येतात .

              वरील सर्व गोष्टींवरून अति प्रमाणात चहा पिणे आरोग्याला अपायकारक आहे हे तुम्हला समजलेच असेल संपूर्ण दिवसभर मधून कोट्यावधी रुपयाचा चहा विकला जातो आणि भारतामध्ये तरी याचे प्रमाण खूप जास्त चहा पिला जातो. जगात चहात जास्त प्रमाणात साखर घालून पिण्यात भारत एक नंबरवर आहे.

               चहात आपल्या बुद्धिमत्ता आणि मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करणारा घटक असतो चहा जितका उकळून घ्या तेवढेच जास्त टॅनीन त्या पाण्यामध्ये उतरते बाहेर तुम्ही पाहिल असेल की हॉटेलवर टपरीवर चहाचे भांडे दिवसभर गॅसवर उकळत ठेवलेली असतात त्यामुळे टॅनीनचे प्रमाण प्रचंड प्रमाणामध्ये चहामध्ये वाढलेले असतात जे आपल्या शरीराला खूप घातक सिद्ध होतं आणि म्हणूनच असा चहा घेणार टाळल पाहिजे.

               चहामुळे जरी आपल्या तरतरी येत असली तरी ती तात्पुरती असते. बुद्धिमत्ता कमी होते विस्मरण होते हाड कमजोर होतात आणि मानसिक स्वास्थ्य बिघडते म्हणून काम करण्याची क्षमता वाढते परंतु आरोग्यावर दुष्परिणाम अतिप्रमाणात आणि चुकीच्या पद्धतीने चहा प्यायल्यामुळे होतो.

              चहा पिल्यावर आपल्याला जास्त लघवी लागते आणि तुम्ही जर दिवसातून चार-पाच कप चहा घेतला तर मुत्राशयावर ताण पडतो यामुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता असते त्याचबरोबर स्त्रियांमध्ये मासिक पाळी पूर्वी खूप पोट दुखणे कंबर दुखणे ही लक्षणे जाणवतात रक्तवाहिन्या प्रसरण पावतात आणि रक्तप्रवाह वाढतो आणि त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाणसुद्धा वाढते शरीरातील उष्णता 10 ते 20 टक्‍क्‍यांनी वाढते.

              मित्रांनो दुधातला चहा घेत असाल तर तो पुर्ण बंद करा. त्याचप्रमाणे जर तुम्ही करण्याची पद्धती बदलली तर हे सर्व धोके कमी होऊ शकतात तर चहा घेण्यापेक्षा तुम्ही ग्रीन टी किंवा गुळाचा चहा घ्या. नव्वद टक्के आजार बरे होतील.

              तुम्ही ब्लॅक टी घ्या यासाठी एका पाणी उकळून घ्या आणि गॅस बंद करा यात चहा पावडर टाका आणि भांडे दोन-तीन मिनिटे झाकून ठेवा. चहा गाळून प्या. खूप गरम चहा पिऊ नका. अशा पद्धतीनेच चहा बनवून प्यायची सवय लावून घ्या. या चहा मुळे तुमचं आरोग्य चांगले राहील पावसाळ्याच्या दिवसांमध्ये चहा आपल्या शरीराची उष्णता कायम राखण्यासाठी चांगला असतो परंतु या पद्धतीने तुम्ही चहा बनवला तर तो तुमच्या शरीरासाठी चांगला असते .

             या साध्या साध्या गोष्टी जर आपण काय तर चहा जो आहे तो आपल्या शरीरावर एवढा घातक परिणाम करणार नाही म्हणून या गोष्टीचे पालन करा आणि दुसरी महत्वाची गोष्ट लहान मुलांना अजिबात चहा देऊ नका कारण लहान मुलांच्या अवयवांचा तेवढा विकास झालेला नसतो.

वरील माहिती ही वेगवेगळ्या तथ्यांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे.. अधिक माहितीसाठी आपल्या डोक्टरांचा  सल्ला घ्या.. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमच्याशी जोडले जा लाइक आणि शेअर करायला विसरू नका

लडाखमध्ये जवानांच्या गाडीला भीषण अपघात; २६ पैकी ७ जवानांचा मृत्यू

 


लडाखमधील तुरतुक सेक्टरमध्ये भारतीय सैन्याची गाडी दरीत कोसळ्यामुळे ७ जवानांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गाडीत एकूण २६ जवान प्रवास करत होते. 

शुक्रवारी सकाळी ९ वाजता जवानांचा हा ट्रक परतपूर येथील ट्रांजित कॅम्पवरुन हानिफ सेक्टरकडे जात होता. जेव्हा हा ट्रक थोईसपासून २५ किलोमीटर दूर आला तेव्हा ट्रकचालकाचे अचानक नियंत्रण सुटले आणि ट्रक ५० ते ६० फूट खोल श्योक नदीत पडला. या अपघातात ७ जवानांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जवान गंभीर जखमी झाले आहेत.


पहा मुलींची फ्री स्टाइल हाणामारी

 शालेय जीवन म्हटलं की मित्र-मैत्रिणींसोबतचे वाद आले, त्यात लुटूपुटूची मारामारीही कधी होते. मात्र, या गोष्टी सहसा मुलांमध्ये घडतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क मुली एकमेकींशी मारामारी करताना दिसत आहेत. शाळेचा गणवेश परिधान केलेल्या या मुली भर रस्त्यात फ्री स्टाईल हाणामारी करताना दिसत आहेत. नेटकरी देखील या व्हिडीओवर भरभरून कमेंट्स करत आहेत.

शाळकरी मुलांची भांडणं, त्यातही त्या मुली आणि भर रस्त्यात सुरु असणारी त्यांची ही हाणामारी पाहून लोकही गोंधळून गेले आहेत. या मुलींनी एकाच प्रकारचे गणवेश परिधान केले असल्याने, त्या सगळ्या एकाच शाळेत शिकत असाव्यात, असा अंदाज बांधला जात आहे. मात्र, या मुली नेमक्या कोणत्या कारणावरून इतकी भयंकर हाणामारी करत असाव्यात, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.   

पाहा व्हिडीओ :


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये काही शाळकरी मुली आपापसात भांडताना दिसत आहेत. यादरम्यान सगळ्या मुलींनीही एकाच शाळेचा हिरव्या रंगाचा गणवेश परिधान केला आहे. भांडण सुरु असतानाच या मुली एकमेकींशी हाणामारी करू लागतात. यातील मुली चक्क एकमेकींचे केस आणि कपडे ओढून मारमारी करत आहेत. तर, काही मुलींच्या हातात काठी आहे, ज्याने त्या इतर मुलींना मारत आहेत. त्याचबरोबर काही मुलींमध्ये लाथा-बुक्क्याचेही प्रकार सुरू आहेत. दरम्यान, या भांडणामध्ये जाऊन काही मुलंही या मुलींची भांडणं थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

नेटकरीही गोंधळले!

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या हा व्हिडीओत मुलींना अशाप्रकारे हाणामारी करताना पाहून अनेक लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मात्र, या मुलींच्या गटामध्ये मारामारी का झाली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. तसेच, ही घटना कुठे घडली हे देखील समजू शकलेले नाही. सोशल मीडियावर चर्चेत आलेला हा व्हिडीओ आतापर्यंत 1.35 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. यासोबतच लोक वेगवेगळ्या पद्धतीने व्हिडीओवर कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

‘‘तुम्ही घरी जा, स्वयंपाक करा. दिल्लीत जा, नाही तर मसणात जा’’; चंद्रकांत पाटील यांचे सुप्रिया सुळेंना उद्देशून विधान

 


राजकीय : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना भाजप प्रदेशाध्य चंद्रकांत पाटलांची जीभ घसरली. सुप्रिया सुळेंवर पाटलांनी अत्यंत शेलक्या भाषेत टीका केलीये. "तुम्ही घरी जा, स्वयंपाक करा. खासदार असून तुम्हाला कळत नाही. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या", असं चंद्रकांत पाटील म्हणाले.


ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सध्या राज्यातील तापमान चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरक्षणावरून टीकेची झोड एकमेकांवर उठवली जात आहे. आज भाजपने आक्रमक पवित्रा घेत मंत्रालयावर मोर्चा काढला. यावेळी भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी यात सहभाग घेतला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनीही यात सहभाग घेत सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली. तसेच, त्यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर वैयक्तिक टीका केलीये.

गूळ खाणे किती महत्त्वाचे ? मग नक्की वाचा !






आरोग्यविषयक : ऋतुमानानुसार आहार हे आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. सणासुदीच्या निमित्ताने आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश केलेला आढळतो. आता थंडीच्या दिवसात आवर्जून गुळाच्या पदार्थांचा आहारात समावेश केला जातो. पण नेहमीच गुळाचे (Jaggery) सेवन केल्यास आरोग्यासाठी ते फायदेशीर ठरते. भारतीय संस्कृतीत घरी येणाऱ्याला विशेषतः उन्हातून आल्यास गूळ आणि पाणी देण्याची प्रथा आहे. गुळाचे आरोग्याला असणारे अनेक फायदे सिद्ध झाले आहेत. जाणून घेऊया गुळ खाण्याचे विविध फायदे

1. शरीर कार्यक्षम राहतं - गुळामुळे शरीर मजबूत आणि कार्यक्षम राहते. शरीर ताकदवान बनवण्यासाठी दुधात गूळ घालून घेणे उपयुक्त ठरते. दुध आवडत नसल्यास एक कप पाण्यात पाच ग्रॅम गूळ, थोडासा लिंबू रस आणि काळे मीठ घालून प्यायल्यास थकवा दूर होईल.

2. पोटाच्या तक्रारींवर गुणकारी - पोटाच्या विविध तक्रारींवरही गूळ हा रामबाण उपाय आहे. गॅसेस, अॅसिडीटीची (Acidity) तक्रार असेल तर, गूळ खाण्याने त्रास कमी होतो.

3. रक्ताची कमतरता भरून निघते - गूळ हा लोहाचा (Iron) मोठा स्रोत आहे. तुमचं हिमोग्लोबिन (Hemoglobin) कमी झाले असेल तर रोज गूळ खाण्यानं तात्काळ फायदा होतो. गूळ खाण्यानं शरीरातील लाल पेशींची संख्या वाढते. त्यामुळे गर्भवती महिलांना डॉक्टर गूळ खाण्याचा सल्ला देतात.

4. सांधेदुखीतून सुटका – सांधे दुखत असतील (Joint Pains) तर गूळ आणि आलं एकत्र करून खाल्ल्यास फायदा होतो. दररोज आलं आणि गुळाचा एक खडा खाल्ल्यास सांधेदुखीला आराम पडतो.




5. भूक लागणं – जेवणानंतर गूळ खाल्ल्यानं पचन चांगलं होतं. गूळ खाण्यानं भूकही वाढते.

6. थकवा दूर होतो – गूळ खाण्यानं शरीराला ऊर्जा मिळते. थकवा दूर होतो. थकवा, कमजोरी जाणवत असेल तर जरूर गूळ खावा.

7. आंबट ढेकरींपासून सुटका – गूळ, सैंधव आणि काळे मीठ एकत्र करून खाल्लं तर आंबट ढेकर येणं थांबते.

8. रक्तदाब नियंत्रणात राहतो - गुळामुळे रक्तदाब (Blood Pressure) नियंत्रणात राहण्यास मदत होते. विशेषतः उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या लोकांना गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो.

9. हाडं मजबूत होतात - गुळात कॅल्शियम आणि फॉस्फरस यांचं प्रमाण अधिक असतं. हाडांना (Bones) बळकट करण्यात हे दोन्ही घटक महत्त्वाचे असतात. त्यामुळे गूळ खाण्यानं हाडांसाठीही लाभदायी ठरते.

10. फुफ्फुसातील संसर्ग रोखतो - गुळामुळे रक्त शुद्ध होत. चयापचयाचा (Metabolism) वेगही नियंत्रित राहतो. याशिवाय घसा आणि फुफ्फुसाच्या (Lungs) संसर्गावरही गूळ फायदेशीर ठरतो.

रिंकू राजगुरूचा नवा लूक,आणखी एका नव्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित



मनोरंजन : नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटातून मराठी कलाविश्वात पदार्पण करणारी ‘आर्ची’ अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरू हे नाव कोणालाही नवीन राहिलेलं नाही. नुकतंच झुंड या चित्रपटात झळकलेली रिंकू लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिंकू राजगुरुच्या नव्या चित्रपटाचा टीझर नुकतचं प्रदर्शित झाला आहे. या टीझरमुळे प्रेक्षकांची चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे.

रिंकू राजगुरु आणि विशाल आनंद ही नवी जोडी असलेला “आठवा रंग प्रेमाचा” या चित्रपटाचा टीझर नुकतचं प्रदर्शित झाला. अत्यंत फ्रेश आणि रोमँटिक कथा असलेल्या या चित्रपटाच्या लक्षवेधी चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली आहे. येत्या १७ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्येष्ठ अभिनेते मकरंद देशपांडे, रिंकू राजगुरू आणि विशाल आनंद हा नवा अभिनेता या चित्रपटातून पदार्पण करत आहे.

“आठवा रंग प्रेमाचा” या चित्रपटात आजच्या काळातली आणि फ्रेश कथा प्रेक्षकांना पाहता येईल. चित्रपटाच्या नावातच प्रेमाचे आठ रंग असल्याचं सांगण्यात आलं आहे. या चित्रपटाच्या टीझरमधून पहिले सात रंग कोणते ते स्पष्ट केलं आहे, आठवा रंग कोणता? याचं उत्तर चित्रपटाद्वारे मिळणार आहे. यात रिंकू राजगुरूचा ग्लॅमरस लूक, विशाल आनंदची चित्रपटसृष्टीतली दमदार एंट्री पाहायला मिळत आहे.



एलिमिनेटर सामन्यात बंगळुरुचा लखनऊवर विजय, क्वॉलिफायर-२ मध्ये राजस्थानसोबत लढत



 खेळ-जगत :  आयपीएल या टी 20 क्रिकेट स्पर्धेमध्ये आज एलिमिनेटर लढत खेळवली गेली. लखनऊ  आणि बंगळुरूच्या संघांमध्ये खेळवलेल्या गेलेल्या सामन्यात बंगळुरूने बाजी मारली आहे. बंगळुरूने लखनऊच्या संघाचा १४ धावांनी पराभव करत क्वॉलिफायर २ मध्ये प्रवेश केला आहे. अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी चॅलेंजर्स बंगळुरूला क्वॉलिफायर २ चा अडथळा पार करावा लागणार आहे. २७ मे रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर क्वॉलिफायर २ सामना खेळवला जाईल. या सामन्यात राजस्थान आणि बंगळुरूची लढत होईल.

बंगळुरूने दिलेल्या २०८ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या लखनऊची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. सलामीवीर क्विंटन डी कॉक अवघ्या सहा धावा करून तर मनन वोहरा १९ धावांवर बाद झाले. त्यानंतर कर्णधार केएल राहुल आणि दीपक हुड्डा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दीपकने ४५ धावा केल्या. लखनऊचा कर्णधार केएल राहुलने एकाकी किल्ला लढवत विजय मिळवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केला. मात्र, जोश हेजलवुडने त्यालाही महत्त्वाच्याक्षणी बाद करत लखनऊच्या स्वप्नांवर पाणी फिरवले. आरसीबीच्यावतीने जोश हेजलवुड सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने तीन बळी मिळवले तर मोहम्मद सिराज, हर्षल पटेल आणि वानिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

पैसे चुकीच्या बँक खात्यात जमा झाले; करा हे काम

 


The Update : 

पैसे चुकीच्या बँक खात्यात जमा झाल्यास सर्वात प्रथम तुमच्या बँकेच्या ब्रँचला भेट द्या. तुम्हाला कोणत्याही बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत, रक्कम किती होती, ही सर्व माहिती मॅनेजरला द्यावी लागेल. बँकेला माहिती दिल्याने त्वरित कारवाई करून तुम्हाला पैसे परत मिळण्यास मदत होईल. तुम्हाला लिखित अर्ज देखील द्यावा लागेल.

जर तुमचे व रिसिव्हरचे अकाउंट एकाच बँकेत असल्यास, बँकेकडून रिसिव्हरशी कॉल व ईमेलच्या माध्यमातून संपर्क साधला जातो. रिसिव्हरने परवानगी दिल्यास पैसे परत मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातात. जर चुकीने रिसिव्हरच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर झाले आहेत व ती व्यक्ती पैसे परत देण्यास तयार असल्यास तुमची रक्कम ७ दिवसांच्या आत परत मिळेल.

रिसिव्हरने पैसे परत करण्यास नकार दिल्यास? असा प्रश्न निर्माण होतो. अशा स्थितीमध्ये तुम्हाला कायदेशीर पद्धतीने पुढे जावे लागेल. तुम्ही FIR नोंदवून देखील पैसे परत मिळवू शकता. मात्र, लक्षात ठेवा की नकळत चुकीच्या बँक अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर झाल्यास, त्वरित तुमच्या बँकेला याबाबत माहिती द्या. यामुळे पैसे परत मिळवण्यास तुम्हाला मदत होईल.


प्लॅस्टिक सर्जरी पडली महागात ; अभिनेत्रीच 21 व्या वर्षी निधन

 


The Update : 

गीताआणि दोरेसानीया लोकप्रिय टीव्ही मालिकेची अभिनेत्री चेतना राजचं वयाच्या २१ व्या वर्षी निधन झालं आहे. चेतनानं बंगळुरूच्या एका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. तिचं निधन प्लॅस्टिक सर्जरीमुळे झाल्याचं बोललं जात आहे. तिला फॅट फ्री सर्जरीसाठी बंगळुरूच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर तिची तब्येत अचानक बिघडली. तिच्या फुफ्फुसात पाणी जमा झाल्यानं तिचं निधन झाल्याचं बोललं जात आहे.

ती तिच्या मैत्रिणींसोबत रुग्णालयात गेली होती. सर्जरी झाल्यानंतर संध्याकाळी तिला त्रास जाणवू लागला. तिच्या फुफ्फुसांमध्ये पाणी जमा होऊ लागलं आणि त्यानंतर काही तासांमध्येच तिचा मृत्यू झाला. या घटनेनं तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान चेतनाच्या आई- वडिलांना या घटनेसाठी डॉक्टरांना जबाबदार धरलं आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे त्यांना आपली मुलगी गमवावी लागल्याचं त्यांचं म्हणणं आहे. अभिनेत्रीच्या वडिलांनी रुग्णालय व्यवस्थापनाच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. चेतना कन्नड टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री होती.

नाना पटोले - राज्याने CNG चे दर कमी केले ; केंद्राने वाढवले.

 


केंद्र सरकारने नैसर्गिक वायूच्या किमतीत वाढ केल्याने सीएनजीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. शिवाय, राज्य सरकारवर केंद्रकाडून केल्या जाणाऱ्या टीकेला देखील प्रत्युत्तर दिलं आहे.

“महाराष्ट्र सरकारने सीएनजीवरील वॅट १३.५ टक्क्यांवरुन घटवून ३ टक्क्यांवर आणला. पण केंद्रातील भाजपा सरकारने याच काळात सीएनजीच्या दरात ३० रुपयांनी वाढ करुन जनतेला मिळणाऱ्या दिलाशाच्या मार्गात अडथळा आणला.” अशा शब्दांमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे.

तसेच, “महागड्या पेट्रोलियम उत्पादनांवरुन राज्य सरकारांवर खापर फोडण्याऐवजी केंद्र सरकारने आत्मचिंतन करावे.” असा सल्ला देखील नाना पटोलेंनी दिला आहे.