DDA Recruitment 2022: बंपर भरती! २७९ रिक्त जागा; जाणून घ्या अधिक तपशील

 



दिल्ली विकास प्राधिकरण (DDA) ने सहाय्यक संचालक (लँडस्केप), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल/मच) बी, प्रोग्रामर, कनिष्ठ अनुवादक (राजभाषा) पदांच्या भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार dda.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया ११ जूनपासून सुरू झाली आहे.

याशिवाय, उमेदवार https://cdn.digialm.com/EForms/configured या लिंकवर क्लिक करून या पदांसाठी थेट अर्ज करू शकतात. यासह, तुम्ही https://cdn.digialm.com//per/g01/pub/726/EForms/image/Image या लिंकद्वारे अधिकृत अधिसूचना देखील पाहू शकता. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण २७९ पदे भरली जातील.

महत्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – ११ जून २०२२

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० जुलै २०२२

रिक्त जागांचा तपशील

एकूण पदांची संख्या – २७९

(हे ही वाचा: SBI Recruitment 2022: ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’मध्ये नोकरीची संधी; जाणून घ्या अधिक तपशील)

पात्रता निकष

असिस्टंट डायरेक्टर (लँडस्केप) – लँडस्केप आर्किटेक्चर मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा स्थापत्यशास्त्रातील पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून समकक्ष किंवा वनस्पतिशास्त्र किंवा कृषी किंवा फलोत्पादनातील पदवीधर. तसेच, मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून लँडस्केप नियोजनाचा किमान एक वर्षाचा अनुभव.

जेई – संबंधित क्षेत्रात डिप्लोमा.

प्रोग्रामर – संगणक विज्ञान/संगणक अभियांत्रिकी/इलेक्ट्रॉनिक्स मधील अभियांत्रिकी पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा अभियांत्रिकी महाविद्यालय/संस्थेमधून संगणक विज्ञान/संगणक अनुप्रयोगातील पदव्युत्तर पदवी.

कनिष्ठ अनुवादक (राजभाषा) – एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी किंवा पदवी स्तरावर इंग्रजी विषय म्हणून हिंदीमध्ये किंवा समकक्ष पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी किंवा पदवी स्तरावर विषय म्हणून इंग्रजीमध्ये समकक्ष. तसेच मान्यताप्राप्त संस्थेतून अनुवादाचा डिप्लोमा/ सर्टिफिकेट कोर्स असावा.

नियोजन सहाय्यक – मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून नियोजन/आर्किटेक्चरमध्ये बॅचलर पदवी.

वायोमार्यदा किती आहे?

सहाय्यक संचालक (लँडस्केप) – ३५ वर्षे

जेई – १८ ते २७ वर्षे

प्रोग्रामर – ३० वर्षे

कनिष्ठ अनुवादक – ३० वर्षे

नियोजन सहाय्यक – ३० वर्षे

अर्ज फी किती?

उमेदवारांना १०००/- रुपये भरावे लागतील.

१० वी निकाल ; घरबसल्या मोबाईल मध्ये चेक करा..


 

10 वी निकाल 2022 कसा चेक करायचा : 

विद्यार्थी मित्रांनो दहावीचा निकाल 2022 कधी लागेल. दहावीचे विद्यार्थी दहावीच्या निकालाची खूप वाट पाहत आहे. एसएससी बोर्ड महाराष्ट्र दहावीचा निकाल तारीख 20 जुन पर्यंत दहावीचा निकाल लागेल अशी शक्यता दर्शवण्यात येत आहे. दहावीचे पेपर लवकरच तपास न पूर्ण होणार आहे. दहावीचे पेपर चेक झाल्यानंतर लगेच दहावीचा निकाल लागेल. (10th SSC Result 2022 link) 

विद्यार्थी मित्रांनो दहावीचा निकाल लवकरच लागेल. परंतु दहावीचा निकाल पाहण्याची वेबसाईट कोणती दहावीचा निकाल मोबाईल मधून कसा चेक करायचा. दहावीचा निकाल चेक करण्याची ची पद्धत कशी आहे हे मुलांना माहीत नसतं तर तुम्ही तुमच्या मोबाईल च्या मदतीने तुमचा दहावीचा निकाल कसा चेक करायचा त्याबद्दल या पोस्टमध्ये माहिती दिली जाणार आहे. जेणेकरून दहावीचा निकाल लागल्यानंतर तुम्हाला सोयीचे होईल आणि तुम्ही लवकर मोबाईल मधून दहावीचा निकाल चेक करू शकता. 

10 वी निकाल 2022 महाराष्ट्र कसा पाहायचा ? 

1) दहावीचा निकाल या वेबसाईटच्या मदतीने तुम्ही निकाल पाहू शकता

2) सर्वात आधी खालील दिलेल्या वेबसाईटवर ती क्लिक करा

http://sscresult.mkcl.org

3) तुम्हाला तुमचा Seat Number टाकावा लागेल.

4) त्यानंतर तुमच्या हॉल तिकीट वरती असलेले तुमचे आईचे नाव टाका.

5) View Result या बटणावर क्लिक करा.

6) तुम्ही जर माहिती बरोबर टाकली असेल तर तुमचा निकाल तुम्हाला दिसेल.

7) खाली Print असा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करून प्रिंट काढू शकता किंवा मोबाईलमध्ये सेव करू शकता.

आयपीएल’ प्रसारण हक्क ; पहिल्या दिवशी ४३ हजार कोटींहून अधिकची बोली ; ‘आयपीएल’ प्रसारण हक्कांसाठी प्रति सामन्यामागे १०० कोटींचा टप्पा पार


 इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या पुढील पाच हंगामांसाठी (२०२३ ते २०२७) प्रसारण हक्कांच्या ई-लिलाव प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी रविवारी विविध समूहांनी टीव्ही आणि डिजिटल माध्यमांचे हक्क प्राप्त करण्यासाठी प्रति सामन्यासाठीचा आकडा १०० कोटींपलीकडे गेला. म्हणजेच प्रसारण हक्काच्या बोलीने एकत्रित एकूण आकडा ४३,०५० कोटी रुपयांपर्यंत उंचावला आहे.

२०१७मध्ये झालेल्या गेल्या प्रसारण हक्क लिलाव प्रक्रियेत स्टार इंडियाने १६,३४७.५ कोटी रुपयांसह पाच हंगामांसाठीचे (२०१८-२२) प्रसारण हक्क मिळवले होते. यंदा मात्र या रकमेत जवळपास तिपटीने वाढ झाली आहे. यंदा दोन दिवस चालणाऱ्या ई-लिलाव प्रक्रियेत चार विभागांमध्ये प्रसारण हक्क दिले जाणार असून, हा आकडा ५० हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अ-विभागात भारतीय उपखंडातील टीव्ही (प्रसारण) हक्कांचा समावेश आहे. हे हक्क मिळवण्यासाठी पहिल्या दिवशी ५७ कोटी रुपयांची (प्रति सामना) बोली लावण्यात आली. तसेच ब-विभागात समाविष्ट असलेले भारतीय उपखंडासाठी डिजिटल माध्यमांचे हक्क प्राप्त करण्याकरिता ४८ कोटी रुपयांची (प्रति सामना) बोली लागली. त्यामुळे प्रति सामन्यामागील एकूण रक्कम ही १०५ कोटी इतकी झाली आहे.

पहिल्या दिवशी जवळपास सात तास चाललेल्या लिलाव प्रक्रियेत व्हायकॉम १८, डिझ्नी-स्टार, सोनी आणि झी या चार समूहांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली.

चार विभागांमध्ये लिलाव

अ-विभाग : भारतीय उपखंडातील टीव्ही (प्रसारण) हक्क

ब-विभाग : भारतीय उपखंडासाठी डिजिटल माध्यमांचे हक्क

क-विभाग : डिजिटल माध्यमांमध्ये प्रत्येक हंगामात निवडक १८ सामन्यांचे (सलामीचा सामना, अंतिम सामना, बाद फेरीचे सामने समाविष्ट) हक्क

ड-विभाग : परदेशातील टीव्ही आणि डिजिटल हक्क

’, ‘’ विभागासाठी ५५०० कोटींची बोली? रविवारी अ आणि ब विभागांतील प्रसारण हक्कांसाठी लिलाव झाला. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर क आणि ड विभागासाठी लिलाव सुरू होईल. या दोन विभागांतही मोठय़ा बोलींची ‘बीसीसीआय’ला अपेक्षा आहे. ‘‘क आणि ड विभागांसाठी साधारण ५५०० कोटी रूपयांची बोली लागू शकेल,’’ असे ‘बीसीसीआय’च्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

अवयवदानामुळे ४३ वर्षीय व्यक्तीला जीवनदान..दुर्मीळ लहान आतडय़ाच्या प्रत्यारोपणाची पहिलीच शस्त्रक्रिया ग्लोबल रुग्णालयात यशस्वी

दुर्मीळ अशी लहान आतडय़ाच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया ग्लोबल रुग्णालयात नुकतीच करण्यात आली. मुंबईतील अशा स्वरूपाची ही पहिलीच शस्त्रक्रिया आहे. जे.जे. रुग्णालयात मेंदूमृत झालेल्या मध्यमवयीन महिलेच्या नातेवाईकांनी अवयवदान करण्यास संमती दिल्याने अनिर्बन सामंता यांना पुन्हा नवे जीवन मिळाले आहे.

कोलकत्याचे रहिवासी असलेल्या अनिर्बन यांना एप्रिल २०२२ मध्ये आतडय़ामध्ये सुपीरियर मेसेंटरिक आर्टरी थ्रोम्बोसिसचे निदान झाले. यामुळे गँगरीन झाल्याने लहान आतडे काढून टाकावे लागले. कोलकत्यामध्ये ही शस्त्रक्रिया झाली. यावर आतडे प्रत्यारोपण हा एकमेव उपाय असून यासाठी मुंबईलाच जाण्याचा पर्याय तेथील डॉक्टरांनी सुचविला. डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार परळच्या ग्लोबल रुग्णालयात हे कुटुंब दाखल झाले. १८ मे रोजी जे.जे. रुग्णालयातील मेंदूमृत रुग्णाच्या नातेवाईकांनी लहान आतडे दान करण्याची परवानगी दिल्याने अनिर्बन यांच्यावर लहान आतडे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया ग्लोबल रुग्णालयात यशस्वीपणे पार पडली. प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अतिशय आव्हानात्मक असल्याने जगभरात या शस्त्रक्रिया होण्याचे प्रमाण दुर्मीळ आहे.

कंगनाला सोशल मीडियावरून नेटकऱ्यांनी केले ट्रोल.. सत्यता कळताच डिलीट केली पोस्ट



बॉलीवूडची क्वीन म्हणजेच अभिनेत्री कंगना रणौत ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. कंगना सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. कंगना ही नेहमीच सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय यासारख्या वेगवेगळ्या गोष्टींवर आपली भूमिका मांडताना दिसते. यावरून तिला सोशल मीडियावर बऱ्याच वेळा ट्रोल देखील करण्यात येते. आता पुन्हा एकदा कंगना वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
आता कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये कंगनाने कतार एअरवेजचे सीइओ अल बेकर यांच्या एका स्पुफ व्हिडिओवर प्रतिक्रिया देऊन त्यांची टिंगल केली आहे. कंगनानं कतार एअरवेजचे सीइओ यांच्या एका वेगळ्याच व्हिडिओचा स्क्रीन शॉट सोशल मीडियावर शेयर केला. काहीही न कळणाऱ्या व्यक्तीला गरीब माणसांची कसलीच किंमत वा जाणीव नसते. ती व्यक्ती कायमच दुसऱ्यांना पाण्यात पाहण्याचे काम करते. तुमच्यासारखे श्रीमंत लोक हे नेहमीच गरिबांना तुच्छ लेखतात, असेही कंगनानं त्या प्रतिक्रियेमध्ये म्हटले होते.
ज्यावेळी कंगनाला खऱ्या व्हिडिओविषयी कळालं तेव्हा मात्र तिची चांगलीच फजिती झाल्याचे दिसून आले. त्यानंतर लगेच कंगनाने तिची पोस्ट डिलिट केली.

भारतीय हत्तींची संख्या झपाट्याने का घटतेय? जाणून घेऊया



 

मानवी हस्तक्षेपामुळे जंगल संपत्तीचा ऱ्हास होत असून त्यामुळे आशियाई हत्तींच्या अधिवासाचे क्षेत्र कमी झाले आहे. हस्तिदंत मिळवण्यासाठी हत्तींची मोठ्या प्रमाणावर शिकार होत असून त्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. याशिवाय रेल्वेखाली येऊन हत्तीच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. १९८०च्या दशकात सुमारे ९३ लाख हत्ती आशियात होते, तर सध्या ही संख्या फक्त पन्नास हजारांवर आली आहे. त्यामुळे ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर’ (आययूसीएन) या संघटनेच्या लाल यादीत हत्तीचा समावेश करण्यात आला आहे.

हत्तीचे स्थलांतरण कुठून, कुठे?

महाराष्ट्र, छत्तीसगड, गोवा आणि मध्य प्रदेश हे हत्तीचे पारंपरिक भूक्षेत्र नव्हते, पण महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांत गेल्या १५ वर्षांत हत्तीचे आगमन झाले असून, पारंपरिक हत्तींची भूमी म्हणून पश्चिम बंगाल, ओडीशा व कर्नाटकातील हत्तींनीही नवीन भूप्रदेशाकडे कूच केले आहे. बंदीपूर, मदुमलाई, वायनाड, नागरहोले या वनक्षेत्रामधून हत्ती मानवी वस्तीकडे आले आहेत. अलीकडेच काही महिन्यांपूर्वी आसाममधून महाराष्ट्रात हत्ती आले होते. खानापूर, कनकुंभी व जांबोटीमार्गे व दोडामार्ग मार्गे कोल्हापूरमधील आजरा-चंदगड या भागात हत्ती वनक्षेत्रात आले. ऑक्टोबर २००२ मध्ये हत्तींचे दोडामार्ग मार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदा आगमन झाले.

हत्तीच्या स्थलांतरणाची कारणे काय?

दक्षिण भारतातील जंगलामध्ये घाणेरी व रानमोडी या वनस्पतींच्या बेसुमार वाढीमुळे हत्ती तसेच इतर तृणभक्षी प्राण्यांचे नैसर्गिक अन्न कमी झाले आहे. अन्न-पाण्यासाठी नवीन क्षेत्र शोधणे हा हत्तींचा स्वभावधर्म आहे. कोकण पट्ट्यातील सिंधुदुर्ग जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, चंदगड हे वनक्षेत्र व तेथील वनसंपदा मुबलक आहे. हत्तीचा अधिवास नाहीसा होत असल्याने हत्ती नव्या अधिवासाच्या शोधात स्थलांतर करत आहेत.

हत्तीची संख्या कमी होण्यामागील कारणे काय?

आशियाई हत्तींची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांचे नष्ट झालेले अधिवास व त्यांच्या राहणीमानाच्या ठिकाणाची झालेली नासधूस. आशियातील काही भागांमध्ये हस्तिदंत मिळवण्यासाठी हत्तींची मोठ्या प्रमाणावर शिकार केली जाते. त्यामुळे त्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. हत्तींच्या बहुतांश अधिवासांमधून रेल्वेमार्ग गेले आहेत. या मार्गावर रेल्वेची गती कमी असावी, अशी मागणी वारंवार होत आहे. मात्र, दुर्लक्षामुळे रेल्वेच्या धडकेत हत्तींच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. याशिवाय वीजप्रवाहामुळेदेखील हत्तीचे सर्वाधिक मृत्यू होतात. कारण बरेचदा वीजतारा लोंबकळत असतात. वीजतारांना सोंडेने स्पर्श केला तरीदेखील त्यांचा मृत्यू होतो. हत्तीमुळे होणारे पिकांचे नुकसान अधिक आहे आणि ते वाचवण्यासाठी वीजप्रवाहाचा वापर केला जातो. यात हत्तीचा मृत्यू होतो. भारतात गेल्या दहा वर्षांत सुमारे ४८२ हत्ती केवळ वीज प्रवाहामुळे मृत्युमुखी पडले आहेत.

भारतातील हत्तींची संख्या किती?

केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल खात्याने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात सुमारे २७ हजार ३१२ हत्ती आहेत. जगभरातील हत्तींच्या संख्येपैकी ५५ टक्के इतकी ही संख्या आहे. सुमारे १४ ते १५ राज्यातील २९ हत्ती संरक्षित क्षेत्र आणि हत्तींचा अधिवास असणाऱ्या दहा क्षेत्रांतून ही आकडेवारी समोर आली आहे.

‘प्रोजेक्ट एलिफंट’ची स्थिती काय?

वाघांची संख्या कमी झाल्याची देशभरात चर्चा होते, त्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी प्रयत्नही होतात, पण वाघांप्रमाणेच हत्तीची संख्याही कमीकमी होत आहे. ६५ हजार चौरस किलोमीटरवर पसरलेले हत्तींसाठीचे २९ संरक्षित प्रदेशही या तस्करीबरोबरच अन्य आव्हानांचा सामना करत आहेत. सरकारने काही वर्षांपूर्वी ‘प्रोजेक्ट एलिफंट’ हा प्रकल्प हाती घेतला होता. त्यात हत्तीच्या अधिवासाची सुरक्षा या मुद्द्याचा देखील समावेश होता. मात्र, सध्याची हत्तीच्या अधिवासाची स्थिती पाहता या प्रकल्पाचे काय झाले, याबाबत काहीही स्पष्टता नाही.

विधान परिषदेतही सेनेचे धक्कातंत्र ; ज्येष्ठ नेत्यांना विश्रांती; नंदुरबारचे आमशा पडवी यांना तयारीचा आदेश;

सामान्य शिवसैनिकाला संधी देण्याच्या राज्यसभा निवडणुकीतील कित्ता विधान परिषद निवडणुकीतही गिरवत नंदुरबारचे कट्टर शिवसैनिक व जिल्हाप्रमुख आमशा पडवी यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तयार राहण्याचा आदेश शिवसेनेने दिला आहे. त्याचबरोबर सचिन अहिर यांनीही पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू असे जाहीर करत आपली इच्छा प्रदर्शित केली आहे. त्यामुळे जुन्या नेत्यांना विश्रांती देऊन नव्या लोकांना संधी देण्याचा विचार शिवसेनेत सुरू असल्याचे दिसत आहे.

विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जूनला निवडणूक होत आहे. शिवसेनेचे सुभाष देसाई व दिवाकर रावते हे दोघे निवृत्त होत आहेत. विधानसभेतील संख्याबळानुसार शिवसेनेचे दोन उमेदवार निवडून येऊ शकतात. राज्यसभा निवडणुकीत कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देत सामान्य शिवसैनिकाला मोठय़ा पदावर संधी मिळू शकते असा संदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. तोच कित्ता विधान परिषद निवडणुकीत गिरवत नंदुरबारचे जिल्हाप्रमुख आमशा पडवी यांना विधान परिषदेत संधी देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे.

खासदार संजय राऊत आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दूरध्वनी करून विधान परिषद निवडणुकीसाठी कागदपत्रांची तयारी करण्यास सांगितले, असे आमशा पडवी यांनी माध्यमांना सांगितले. आमशा पडवी यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व आता आदिवासी विकासमंत्री के. सी. पडवी यांना चांगली टक्कर दिली व अवघ्या १२०० मतांनी पराभूत झाले. त्यामुळे आमशा पडवी यांना ताकद देण्यासाठी शिवसेना त्यांना विधान परिषदेवर संधी देत असल्याचे दिसते. त्यामुळे दिवाकर रावते यांना विश्रांती मिळणार हे स्पष्ट होत आहे.

उद्योगमंत्री सुभाष देसाई हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळणार की नाही याचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरेच घेतील. सचिन अहिर यांनी शिवालय या पक्षाच्या कार्यालयात भेट देऊन नेतेमंडळींशी चर्चा केली. अहिर यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचा वरळी मतदारसंघातील विजय सुकर झाला होता. अहिर यांना आमदारकी देऊन आदित्य ठाकरे यांना आगामी निवडणूक जड जाऊ नये हे शिवसेनेचे गणित आहे.

रामराजे निंबाळकरखडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी

विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सभापती रामराजे नाईक निंबाळकर व माजी मंत्री एकनाथ खडसे यांची नावे निश्चित केली आहेत. दोघेही गुरुवारी अर्ज दाखल करणार आहेत.  विधानसभेतील आमदारांच्या संख्याबळानुसार राष्ट्रवादीचे दोन उमेदवार सहजपणे निवडून येतील. पक्षाने सभापती रामराजे नाईक िनबाळकर यांना पुन्हा उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांना दुसऱ्या जागेवर संधी दिली जाणार आहे. खडसे यांचे नाव विधान परिषदेवर नामनियुक्त सदस्यांच्या यादीत शिफारस करण्यात आले होते. परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गेले दीड वर्ष महाविकास आघाडी सरकारने पाठविलेल्या १२ जणांच्या नावावर काहीच निर्णय घेतलेला नाही. खडसे यांच्या नावाला राज्यपालांकडून मान्यता मिळणे कठीण मानले जाते. यामुळेच राष्ट्रवादीने खडसे यांना विधानसभा आमदारांमधून निवडून द्यायच्या जागेवर उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे.  सभापती निंबाळकर आणि संजय दौंड या राष्ट्रवादीच्या दोन आमदारांची मुदत संपत आहे. यापैकी दौंड यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली नाही.

करोना संसर्गाची तिसर्‍या लाटेची तीव्रता सौम्यच ; तज्ज्ञांचे मत; मृत्यू, रुग्णालयात दाखल रुग्णांचे प्रमाण अल्प

राज्यात गेल्या आठवडाभरात करोनाच्या रुग्णसंख्येत सुमारे दीडपटीने वाढ झाली असली तरी मृतांची संख्या अत्यल्प आहे. करोनाचा प्रसार वाढत असला तरी सध्या संसर्गाची तीव्रता सौम्य असल्यामुळे चिंतेचे कारण नाही, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

राज्यात करोना संसर्गाचा प्रसार पुन्हा झपाटय़ाने वाढत आहे. मे महिन्याच्या शेवटच्या काळात दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख पाचशेच्या घरात होता. जूनच्या पहिल्या आठवडय़ात यात वेगाने वाढ होऊन आता तो जवळपास दीड हजारांपर्यंत गेला आहे. तिसरी लाट ओसरण्याच्या काळात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये एवढी रुग्णसंख्या दरदिवशी आढळत होती. राज्यात प्रामुख्याने मुंबई आणि ठाणे येथे नव्याने आढळणाऱ्या रुग्णसंख्येत आठवडाभरात अनुक्रमे १३५ आणि १९१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याखालोखाल पुणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांमध्येही रुग्णसंख्या वाढत आहे.

रुग्णसंख्येत दरदिवशी भर पडत असल्याने उपचाराधीन रुग्णांची संख्याही सात हजारांवर गेली आहे. मुंबईत सर्वाधिक ५ हजार २३८ रुग्ण उपचाराधीन आहेत. याखालोखाल ठाणे, पुणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

राज्यात रुग्णसंख्या वेगाने वाढत असली तरी ही वाढ काही जिल्ह्यांमध्येच आहे. त्यामुळे सध्या या प्रसाराला चौथी लाट असे म्हणता येणार नाही. रुग्णवाढ गेल्या आठवडाभरात वेगाने होत आहे. परंतु त्या तुलनेत मृत्यू किंवा रुग्णालयात दाखल रुग्णांचे प्रमाण अत्यल्प आहे. करोनाच्या या संसर्गाची तीव्रता सौम्य असल्याचे आढळत आहे. त्यामुळे सध्या तरी चिंतेचे कारण नाही. सर्तक राहून जनुकीय चाचण्या, मुखपट्टीचा वापर आणि करोना चाचण्यावर विशेष भर देणे आवश्यक असल्याचे मत करोना कृती दलाचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी व्यक्त केले.

तिसरी लाट ओसरल्यापासून मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे. राज्यात एप्रिलमध्ये १६ मृत्यू झाले होते. मे महिन्यात चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मे महिन्यापासून संसर्ग वाढत असला तरी मृत्यूचे प्रमाण वाढलेले नाही ही आशादायक बाब आहे. त्यामुळे खबरदारीच्या उपायांवर भर द्यावा आणि सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू ठेवता येतील. परदेशांमध्ये लस न घेतेलले, वर्धक मात्रा न घेतलेले किंवा याआधी करोना न झालेल्यांना बाधा होत असल्याचे आढळले आहे. या दृष्टीने संसर्गाची तीव्रता फारशी नसली तरी बाधितांचे बारकाईने विश्लेषण होणे आवश्यक आहे, असे मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.

२५ जिल्ह्यांमध्ये बाधितांचे प्रमाण कमी

संसर्ग वाढत असल्याने राज्यातील बाधितांचे प्रमाणही सुमारे पाच टक्क्यांवर गेले आहे. परंतु करोनाचा प्रसार हा मुंबई, पुणे यासह काही जिल्ह्यांमध्येच वाढत असून येथे बाधितांचे प्रमाण पाच टक्क्यांहून जास्त आहे. रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग, जळगाव आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण दोन टक्क्यांच्या खाली आहे. उर्वरित २५ जिल्ह्यांमध्ये बाधितांचे प्रमाण एक टक्क्यापेक्षाही कमी आहे.

मृत्यूचे प्रमाण कमी

रुग्णसंख्येचा आलेख पुन्हा वर चढत असला तरी मृतांचे प्रमाण अजूनही अल्प आहे. आठवडाभरात राज्यात सात जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यभरात उपचाराधीन रुग्णांच्या तुलनेत सुमारे साडेचार टक्के रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. रुग्णालयात सध्या सुमारे १ टक्का रुग्णांची स्थिती गंभीर असून यामधील केवळ तीन रुग्ण कृत्रिम श्वसनयंत्रणेवर आहेत, तर ५८ रुग्णांना प्राणवायूची आवश्यकता आहे.

मुंबईत ६७६ नवे रुग्ण

मुंबईतील दैनंदिन करोना रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून वाढत असल्याचे चित्र आहे. सोमवारी मात्र त्यात घट दिसून आली. मुंबईत सोमवारी ६७६ नवे रुग्ण आढळले, तर शून्य मृत्यूची नोंद झाली.  मुंबईत सोमवारी नव्याने आढळून आलेल्या रुग्णांपैकी ५४ रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर त्यातील पाच रुग्णांना प्राणवायूची गरज भासली. शिवाय दिवसभरात ३१८ रुग्ण करोनामुक्त झाले. सध्या मुंबईत ५,२३८ रुग्ण उपचाराधीन आहेत. गेल्या २४ तासांत ६ हजार ८९७ चाचण्या करण्यात आल्या.

पाहिल्याच टी-२० सामन्यात भारताचा द. आफ्रिका संघाकडून दारुण पराभव..विश्व रेकॉर्ड थोडक्यात हुकले


 

रासी व्हॅन डर डसेन (४६ चेंडूंत नाबाद ७५ धावा) आणि डेव्हिड मिलर (३१ चेंडूंत नाबाद ६४) यांच्या अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात भारताचा सात गडी आणि पाच चेंडू राखून पराभव केला.दिल्ली येथे झालेल्या या सामन्यात भारताने दिलेले २१२ धावांचे आव्हान पाहुण्या आफ्रिकेने १९.१ षटकांत गाठले. या विजयासह आफ्रिकेने पाच सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा कर्णधार तेम्बा बव्हुमाला (१०) लवकर बाद झाला. त्यानंतर िक्वटन डीकॉक (१८ चेंडूंत २२) आणि ड्वेन प्रिटोरियस (१३ चेंडूंत २९) यांनी आफ्रिकेला सावरले. मात्र, हे दोघे काही षटकांच्या अंतराने बाद झाल्यावर डसेन आणि मिलर यांनी १३१ धावांची भागीदारी रचत आफ्रिकेचा विजय साकारला.

तत्पूर्वी, भारताने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद २११ अशी धावसंख्या उभारली. इशान किशन (४८ चेंडूंत ७६) आणि ऋतुराज गायकवाड (१५ चेंडूंत २३) यांनी अर्धशतकी सलामी दिली. गायकवाड बाद झाल्यावर किशनला श्रेयस अय्यरची (२७ चेंडूंत ३६) साथ लाभली. त्यानंतर अखेरच्या षटकांत कर्णधार ऋषभ पंत (१६ चेंडूंत २९) आणि हार्दिक पंडय़ा (१२ चेंडूंत नाबाद ३१) यांनी फटकेबाजी करत भारताला दोनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला.

संक्षिप्त धावफलक
भारत : २० षटकांत ४ बाद २११ (इशान किशन ७६, श्रेयस अय्यर ३६; वेन पार्नेल १/३२) 

दक्षिण आफ्रिका : १९.१ षटकांत ३ बाद २१२ (रासी व्हॅन डर डसेन नाबाद ७५, डेव्हिड मिलर नाबाद ६४; अक्षर पटेल १/४०)

कंत्राट दाराच्या दुर्लक्षामुळे महापालिकेत सुरक्षा रक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न ..तीन महिन्यांपासून वेतन नाही

तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने महापालिकेत कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. अश्विन वसंत पवार असं या सुरक्षा रक्षकाचे नाव असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या प्रकाराचा राष्ट्रीय मजदूर संघाने तीव्र निषेध केला असून त्याविरोधात मंगळवारी महापालिका भवनासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.

अश्विन पवार हे टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयात नियुक्तीला होते. महापालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे त्यांच्यावर ही वेळ आली आहे. अधिकारी कंत्राटदाराला पाठीशी घालत आहेत, असा आरोप राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी केला.

जगातील प्रमुख देशांत बंदूक परवाना कसा मिळतो?


          
भारत:    
भारतात बंदुकीसारखे अग्निशस्त्र बाळगण्याचा परवाना मिळण्यासाठी व्यक्तीच्या वयाची २१ वर्षे पूर्ण असावी लागतात. संबंधित व्यक्ती असंतुलित मनोवस्थेची किंवा सार्वजनिक शांतता-सुरक्षिततेला धोका न पोहोचवणारी असावी लागते. तसेच अग्निशस्त्र बाळगण्यासाठी केलेल्या अर्जापूर्वी पाच वर्षे संबंधित व्यक्तीस हिंसा अथवा अनैतिक कृत्यांच्या आरोपाखाली शिक्षा झालेली असता कामा नये. संबंधित व्यक्तीचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर गृह मंत्रालय त्या अर्जदाराच्या निवासाजवळील पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याला अर्जदाराविषयी ठराविक मुदतीत तपशीलवार माहितीचा अहवाल देण्यास सांगते. २०१९ मध्ये शस्त्रास्त्र कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार एक व्यक्ती तीनऐवजी आता दोनच अग्निशस्त्रे बाळगू शकते. मात्र, परवान्याची वैधता तीन वर्षांवरून पाच वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

ब्रिटन:
ब्रिटनमध्ये बंदूक परवान्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया क्लिष्ट आहे. परवान्यासाठी अर्ज परवानगीसाठी पोलिसांकडून ३५ प्राथमिक वैधानिक तरतुदींची पूर्तता केली जाते. दुसऱ्या टप्प्यात अनेक कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागते. संबंधित व्यक्ती अग्निशस्त्र योग्य कारणासाठी मागत आहे व त्यामुळे सार्वजनिक सुरक्षेला कोणताही धोका निर्माण होणार नाही, याबाबत पोलिसांची सहमती अनिवार्य आहे. वैद्यकीय तज्ज्ञांकडून मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी, तसेच व्यसनाधीन आणि कुठलाही मेंदुविकार नसल्याचा अहवाल देणे अत्यावश्यक असते. गुन्हेगारीचा इतिहास असलेले वा समाधानकारक वैद्यकीय अहवाल न देऊ शकणाऱ्या १८ वर्षांखालील अर्जदारांना परवाना नाकारला जातो. अग्निशस्त्र-दारूगोळा परवान्याविना खरेदी करणे, बाळगणे किंवा त्यावर प्रक्रिया केल्यास पाच वर्षे तुरुंगवासाची तरतूद आहे. शस्त्रास्त्रांत अवैध बदल केल्यास सात वर्षांच्या कैदेची तरतूद आहे. परवानाधारींनीही आपले अग्निशस्त्र सार्वजनिक ठिकाणी घेऊन फिरणे, एखाद्याच्या खासगी मालमत्तेत घुसखोरी करणे, नशेत असताना हे शस्त्र बाळगणेही दखलपात्र गुन्हा आहे. ब्रिटनमध्ये मार्च २०२० अखेरपर्यंत अग्निशस्त्रांनी ३० हत्या झाल्या. या काळातील एकूण हत्यांपैकी हे प्रमाण चार टक्के होते.

कॅनडा:
कॅनडात नुकतीच अग्निशस्त्र कायद्यात दुरुस्ती झाली आहे. अग्निशस्त्र परवाना मागणाऱ्या व्यक्तीची पार्श्वभूमी तपासणी, अद्ययावत नोंदणी ठेवणे, अग्निशस्त्राचे वर्गीकरण आणि त्यांच्या वाहतुकीसंदर्भात ही दुरुस्ती करण्यात आली आहे. १९७८ पूर्वी नोंदणी केलेल्या स्वयंचलित अग्निशस्त्राचा अपवाद वगळता संपूर्ण स्वयंचलित शस्त्र कॅनडात अवैध आहे. नव्या कायदा दुरुस्तीमुळे अग्निशस्त्र वापरण्यास परवानगी देताना त्याचे तांत्रिक प्रकार कोणते याबाबत तंत्रज्ञांवर जबाबदारी ढकलण्याची पळवाट सरकारला शोधता येणार नाही. बंदुकीच्या परवान्यासाठी वयाची १८ वर्षे पूर्ण असणे अनिवार्य आहे. तसेच परवाना अर्जदाराने कॅनडाचा अग्निशस्त्र सुरक्षा प्रशिक्षण पूर्ण करणेही आवश्यक आहे. हा परवाना पाच वर्षांसाठी दिला जातो. मुदत संपल्यावर वाढवून घेता येते. मात्र, अर्जदाराचा कोणत्याही गुन्ह्याचा इतिहास, कोणताही मानसिक विकार नसावा. तसेच पूर्वी अर्ज प्रक्रियेतून प्रतिबंधित केलेले नसावे. कॅनडात २०२० मध्ये झालेल्या एकूण ह्त्यांच्या घटनांपैकी ३९ टक्के हत्या अग्निशस्त्रांनी झाल्या होत्या.

ऑस्ट्रेलिया:
ऑस्ट्रेलियात अर्ध स्वयंचलित मोठी अग्निशस्त्रे, ‘पंप अॅक्शन शॉटगन’वर प्रतिबंध आहेत. फक्त लष्कर, पोलीस अथवा या शस्त्रांच्या अधिकृत संग्राहकांना ही शस्त्रे बाळगण्याची मुभा आहे. ऑलिम्पिक किंवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधील मान्यताप्राप्त प्रकारांत फक्त ‘हँडगन’ वापरण्याची मुभा आहे. मोठ्या अग्निशस्त्रांना सर्व स्पर्धांत्मक प्रकारांत कायद्याने बंदी आहे. अर्ज मंजुरीच्या प्रक्रियेस २८ दिवस लागतात. अर्जदाराची विविध प्रकारे तपासणी केली जाते. अर्जदाराचे वय १८ वर्षे पूर्ण लागते. हिंसाचार, कौटुंबिक हिंसाचार किंवा त्याच्यावर गेल्या पाच वर्षांत अन्य कुठलेही प्रतिबंधित आदेश नसावे लागतात. चारित्र्य चांगले असावे लागते. तो शारीरिक व मानसिकदृष्ट्या तंदुरुस्तच हवा. प्रथम अर्ज करणाऱ्यांना अधिमान्यता असलेले प्रशिक्षण घ्यावे लागते. पाच वर्षांसाठी परवाना दिला जातो. या काळात परवानाधारकाने अग्निशस्त्र लाकडी किंवा पोलादी कुलुपबंद पेटीत ठेवणे अनिवार्य आहे. सहज तुटणार नाही अशी या पेटीची भक्कम जाडी असावी. अधिकाऱ्यांनी यासंबंधीची नियमित तपासणी व छाननी अहवाल देणे बंधनकारक आहे. २०२० मध्ये ऑस्ट्रेलियात २३२ हत्यांपैकी ११६ हत्या चाकू-सुरीशिवाय अन्य शस्त्रांनी झाल्या.

न्यूझीलंड:
न्यूझीलंडमध्ये ख्राईस्टचर्चमध्ये दोन मशिदींत बेछुट गोळीबाराने झालेल्या हत्याकांडानंतर २०१९ मध्ये बंदुकविषयक कायद्यात मोठ्या सुधारणा करण्यात आल्या. अग्निशस्त्र खरेदी-विक्रीचे नियम नव्या कायद्यानुसार कडक केले आहेत. अग्निशस्त्र-दारूगोळ्यांचा साठा, वाहतुकीचे नियमपालन अनिवार्य आहे. विक्रेत्यांना आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचा परवाना क्रमांक इतर तपशील देणे बंधनकारक आहे. या कर्मचाऱ्यांनीही विक्रीसाठी आलेल्या शस्त्रांच्या तपशीलवार माहितीची नोंद ठेवणे आवश्यक आहे. आठवडाभराच्या नोटिशीनंतर या विक्रेत्यांना सर्व शस्त्रांची तपासणीची मुभा सरकारी यंत्रणांना देणे बंधनकारक आहे. ओळख स्पष्ट करणारे क्रमांक सर्व शस्त्रास्त्रांवर असणे विक्रेत्यांना अनिवार्य आहे. १६ वर्षे पूर्ण झालेली व्यक्ती परवान्यासाठी अर्ज करू शकते. अर्जदाराने त्यासंबंधीचे प्रशिक्षण व परीक्षा उत्तीर्ण करणे अत्यावश्यक आहे. शारीरिक-मानसिक निरोगीपणाच्या खात्रीसाठी अर्जदाराने त्याच्याशी संबंधित व्यक्तींचा संपर्क उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. अर्जजदाराने गेल्या पाच वर्षांत केलेल्या परदेशवारीत तिथे १४ दिवसांपेक्षा जास्त मुक्काम केला असेल, अशा प्रत्येक देशातील प्रवासाचा तपशील देणे नव्या कायद्यानुसार न्यूझीलंडमध्ये बंधनकारक आहे. दहा वर्षांत विविध देशांत सहा महिन्यांपेक्षा जास्त वास्तव्य असल्यास अर्जदाराचा त्या प्रत्येक देशांतील गुन्हेगारीचा इतिहासही तपासणे बंधनकारक आहेे.

जपान:
जपानमध्ये बंदूक बाळगण्याची परवानगी मिळणे खूप कठीण आहे. अर्जदाराला त्यासाठी खूप कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. संबंधित अधिकाऱ्यांना अग्निशस्त्राच्या गरजेविषयी पटवून द्यावे लागते. महिनाभर प्रशिक्षण घेऊन तसे प्रमाणपत्र घ्यावे लागते. वैद्यकीय व गुन्हेगारी इतिहासाची तपासणी व छाननीनंतर पात्रता सिद्ध करण्यासाठी एक परीक्षाही द्यावी लागते. शस्त्र घेताना ग्राहकाला त्यासह त्या शस्त्रप्रकाराची माहिती देणारे प्रमाणपत्रही विक्रेत्याकडून घ्यावे लागते. परवाना इच्छुक किमान १८ वर्षांचा असावा लागतो. शारीरिक-मानसिक तंदुरुस्ती सिद्ध करणे, व्यसनाधीन नसणे, कायमस्वरुपी पत्ता अशा काही अटी आहेत. हिंसाचाराचा इतिहास असलेल्या अर्जदाराचा परवाना नाकारण्याचा अधिकार प्रांतीय सार्वजनिक सुरक्षा आयोगाला असतो. सार्वजनिक ठिकाणी बंदूक वापरण्यास अथवा बाळगण्यास परवानगी नसते. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यास तीन वर्षांची कैद होते. त्यात पाच वर्षांपर्यंत वाढही होऊ शकते. अग्निशस्त्राचा वापर स्वतःच्या लाभासाठी केल्यास एक कोटी येनचा दंड होतो. अग्निशस्त्राशिवाय जपानमध्ये सहा सेंटीमीटरपेक्षा जास्त लांबीची धारदार शस्त्रे बाळगण्यास बंदी आहे. एवढ्या निर्बंधांमागे दुसऱ्या महायुद्धानंतर जपानचे झालेले निर्लष्करीकरण कारणीभूत असल्याचे काहींचे मत आहे. काहींच्या मते जपानमध्ये एकूणच गुन्हेगारी खूप कमी असल्याने जपानच्या नागरिकांना अग्निशस्त्रांची एवढी गरज वाटत नाही.

भारतातील शस्त्रास्त्र कायद्यावरील काही निर्बंध:
भारतीय कायदे शस्त्रास्त्र विक्री आणि त्यांच्या बेकायदा व्यापाराला प्रामुख्याने प्रतिबंध करतात. परवाना असलेल्या शस्त्रांचाही वापर कमी करण्यासाठीच्या तरतुदी त्यात आहेत. उत्पादकाचे नाव,   नोंदणी क्रमांक अथवा अधिकृत ओळखचिन्ह नसलेले निनावी अग्निशस्त्र विकणे भारतीय कायद्यानुसार गुन्हा असून, तसे केल्यास एक ते तीन वर्षांच्या कारावासाची तरतूद आहे. तसेच परवान्याशिवाय अग्निशस्त्रे अथवा दारूगोळ्याची आयात-निर्यात अथवा देशांतर्गत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याची परवानगी नाही. अग्निशस्त्रात अवैध बदल (बंदुकीची नळी छोटी करणे अथवा नकली अथवा खेळातील अग्निशस्त्राचे खऱ्या अग्निशस्त्रात रूपांतर करणे) केल्यास तीन वर्षांची कैद होऊ शकते. यात सात वर्षांपर्यंत वाढ होऊ शकते. अशा शस्त्रांची अवैध निर्मिती, विक्री अथवा हस्तांतरण केल्यास दंडासह किमान सात वर्षे तुरुंगवास अथवा जन्मठेपही होऊ शकते. क्रीडाक्षेत्रात अथवा शेतात पीक संरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘बोअर गन’ला परवानगी आहे. हानिकारक द्रव अथवा वायू सोडणारी अथवा जी शस्त्रे वापरताना त्यांची कळ (ट्रिगर) वापरण्यासाठी अधिक दाब देण्याची गरज असते अशी शस्त्रे भारतात प्रतिबंधित शस्त्रे आहेत.

रिक्षा परवाना मिळणं झाल अशक्य..राज्य सरकारचा प्रस्ताव रिक्षा परवाना वाटपावर लवकरच मर्यादा



            रिक्षांच्या वाढत्या संख्येमुळे प्रवाशांना सध्या झटपट उपलब्ध होणाऱ्या सेवा, वाहतूक कोंडी, चालकांचे विभागलेले उत्पन्न, नुसताच परवाना घेऊन ठेवणे इत्यादींमुळे रिक्षा परवानावाटपावर परिवहन विभागाने मर्यादा आणण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नियुक्त केलेल्या समितीने अहवालही सादर केला असून यावर लवकरच निर्णय होईल, अशी माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली.पाच लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरात परवानावाटप होणार नाही, असे प्रस्तावात नमूद आहे.

            मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी, ठाणे, पुणे, नागपूर, सोलापूर, नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यातील रिक्षांच्या संख्येवर मर्यादा आणावी असे आदेश केंद्र सरकारने नोव्हेंबर १९९७ मध्ये दिले होते. त्यानुसार ठरावीक मर्यादेबाहेर परवाने जारी होणार नाहीत, अशी तजवीज राज्य शासनाने केली होती. त्यामुळे परवानावाटपच बंद झाल्याने रिक्षांबरोबरच टॅक्सींची संख्याही मर्यादित राहिली होती. परंतु वाढत जाणारी प्रवासीसंख्या, या सेवा वेळेत न मिळणे आणि प्रवाशांची होणारी गैरसोय पाहता २०१७ मध्ये रिक्षा परवान्यावरील मर्यादा पूर्णपणे काढण्याचा निर्णय घेतला गेला. त्यानंतर मागेल त्याला परवाना मिळू लागला. त्यामुळे रिक्षांच्या संख्येत भरमसाट वाढ झाल्याचा दावा रिक्षा सघटनांनी केला आहे.

            रिक्षांची संख्या वाढल्याने चालकांचे उत्पन्न विभागले गेले आणि अनेकांना उत्पन्नही मिळू लागले. मात्र वाढलेल्या संख्येमुळे त्याच्या परवानावाटपावर पुन्हा एकदा मर्यादा आणावी, अशी मागणी रिक्षा संघटनांनी परिवहन विभागाकडे केली होती. या मागणीनंतर परिवहन विभागाने परवानावाटपावर मर्यादा आणण्याचा निर्णय घेतला आणि एक समिती स्थापन केली. या समितीने अहवाल तयार करून तो परिवहन विभागाला सादर केला. यासंदर्भात परिवहनमंत्री अनिल परब म्हणाले, ‘‘रिक्षा परवाने खुले झाल्यावर रिक्षांची संख्या वाढली. त्यावर नियंत्रण आणण्याची रिक्षा संघटनांची मागणी आहे. त्यामुळे परवानावाटपावर मर्यादा आणण्याचा विचार आहे. समितीचा अहवालही सादर झाला असून त्यावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल.’’


"सध्याचे राज्यकर्ते हे सभ्य आणि सुसंस्कृत नाहीत" शरद पवारांचे टिकास्त्र..


महाराष्ट्र कनेक्ट काँक्लेव्ह अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांची ज्ञानेश महाराव यांनी आज(शनिवार) पुण्यात मुलाखत घेतली. यावेळी विविध मुद्य्यावरून या नेत्यांना प्रश्न विचारले गेले, ज्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

महाविकास आघाडीच्या नेत्यांवरच ईडी, आयकर विभागाच्या धाडी पडतात, भाजपाच्या नेत्यांवर पडत नाहीत. तुम्ही सत्तेत राहून प्रशासकीय कामकाज देखील पाहीलेलं आहे, अशा पद्धतीने खुलेआम विविध यंत्रणा वापरणं हे कितपत योग्य आहे? हा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारण्यात आला.

शरद पवार म्हणाले, “हे अजिबात योग्य नाही. परंतु सध्याचे राज्यकर्ते हे सभ्य आणि सुसंस्कृत असे राज्यकर्ते नाहीत. त्यामुळे त्यांना असं वाटतं की त्यांनी असं केलं, तर त्यांच्या विचाराशी संघर्ष करणारा जो घटक आहे तो तातडीने शरणागती पत्कारेल. पण तुम्हाला आठवत असेल, विधानसभेच्या निवडणुका होण्या अगोदर मला नोटीस आली होती, त्यानंतर मी आमच्या सहकाऱ्यांना सांगितलं, की सकाळी आपल्याला ईडी कार्यालयात जायचं आणि ईडीच्या कार्यालयात येतो म्हणून फोन केला तर, धावून धावून ईडीचे अधिकारी यायला लागले आणि हात जोडून की येऊ नका, येऊ नका असं म्हणू लागले. त्यामुळे अशी संकटं आल्यानंतर आपलं नाणं खणखणीत असल्याने असल्या दडपशाहीला घाबरायचं नाही. या सगळ्या प्रवृत्तींना धाडसाने तोंड देण्याची भूमिका घ्यावी लागते. या लोकांनी कधी आयुष्यात संघर्षाला खऱ्या अर्थाने तोंड दिलेलं नाही, त्यामुळे त्यांना असं वाटतं की त्यांच्यासारखीच इतर लोक असतील परंतु तीच त्यांची फसगत आहे.”

तसेच, “जाणीवपूर्वक नव्या पिढीमध्ये धर्मवादाचा प्रसार करण्याचं काम काही लोक करतात. माझं स्वच्छ मत आहे, की त्यांना यश येणार नाही. लोक ऐकतील दुर्लक्ष करतील आणि हा विषय सोडून देतील.” असं यावेळी शरद पवारांनी एका प्रश्नाला उत्तर देताना बोलून दाखवलं.
याचबरोबर, “काश्मीर फाईल्स हा चित्रपट संबंध देशामधील लोकांवर काही वेगळा परिणाम करावा, या वृत्तीने तयार केला गेलेला आणि खोटी स्थिती मांडलेला आहे. यामध्ये जे दाखवलय की पंडितांची हत्या तिथे होते आणि जो काळ होता त्या काळात देशात भाजपाच्या मदतीचं सरकार होतं. आज त्या ठिकाणी जे घडतय त्या ठिकाणी ते घडत असताना आजही केंद्रात भाजपाचं सरकार आहे. हे सरकार असताना पंडितांना संरक्षण देण्यासाठी पूर्णपणे ते अपयशी ठरले. काहीतरी चुकीचा विचार मांडून, प्रचार करून लोकांची मतं बदलण्याचा प्रयत्न केला जातोय, हे जाणून घेतलं पाहिजे.” असंही यावेळी शरद पवारांनी बोलून दाखवलं.